Posts

Showing posts from November, 2025
 *गोडं संत-याच्या गावी..* गोड संत-याच्या गावी माझ्या मामाच हो घर त्याला सांगा आम्ही आलो त्याचा लोभ आम्हावर ... ... गोड संत-याच्या गावी राही कामात तो दंग,  त्याची ख्याती दूर दूर रोज गोड खाऊ देई  मामी लळा लावी फार ...  माझ्या मामाच्या गावाचे  काका मामा किती छान रोज रोज आम्हा मिळे  आग्रहाने पाहूणचार .... माझ्या मामाच्या गावाला  मिळे चवळी आणि घोळ आंबा बैगंमपल्ली आणि  किती गोड ती रताळ ... माझ्या मामाच्या मामाच शेतं आहे सोन्यावानी  विठ्ठलाच्या रंगावानी त्याची माती काळी शार मिळे वांग्याचे भरीत आणि वाणीचा हुरडा  संगे मिरचीचा तो ठेचा वरती तेलाची हो धार...  माझ्या मामाच्या गावाला टेकडीचा तो गणेश तोच एक देव अमुचा  त्याचा महिमा थोर नमुन या गणेशाला  वाहू गाण्याची ही माळ  सुखी ठेव या सा-यांना तुला भेटू वारंवार गोड संत-याचा गावी  माझ्या मामाच हो घर