Posts

Showing posts from April, 2026
Image
 *आयकॉनिक डरेसबुरी टॉवर* काही दिवसांपूर्वी  धक्का-मार पुष्कर यांनी घेतलेली लीना फाटक काकूंची अत्यंत प्रेरणादायी मुलाखत पहिली. धुळ्याहून लंडन, आणि पुढे स्कॉटलंड वगैरे फिरून फाटक दांपत्य शेवटी वॉरिंग्टन मधे स्थाईक झाले. पण वॉररिंग्टन मधेच कां? कारण मुकुंद काकांकडून इथे एक महान कार्य व्हायचं होतं. ५० वर्षांपूर्वी त्यांनी बांधलेलं डरेसबरी टॉवर आजही मान उंच करून उभं आहे. *व्हॅन द ग्राफ* या एका त्याकाळच्या नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रकल्पाकरता  हे टाॅवर  तयार होत होतं. त्याच डिझाहीनही तितकच नाविन्यपूर्ण होतं. २ मीटर जाड भिंतींना कमीतकमी १०० वर्षं अगदी लहानसा सुद्धा  तडा जाणार नाही, त्याचा पांढरा रंग थोडाही बदलणार नाही या करता लागणारं सिमेंट विशेष संशोधनातून तयार केलं होतं. ही रेसिपी आता जगभरातील सर्व न्युक्लिअर आणि तीव्र रेडिएशन असणाऱ्या प्रकल्पामध्ये वापरली जाते. त्या टॉवरची रचनाही अत्यंत कल्पक आहे. आकाश निरभ्र असताना टॉवरच्या एका बाजूला लिव्हरपूल तर दुसऱ्या बाजूला मँचेस्टर पर्यंत तर पायथ्याशी मर्सीचे हिरव्यागार शेतातून वाहणारे दोन छोटे कालवे दिसतात. मधून मधून लंडन- ग्...