*आयकॉनिक डरेसबुरी टॉवर*


काही दिवसांपूर्वी  धक्का-मार पुष्कर यांनी घेतलेली लीना फाटक काकूंची अत्यंत प्रेरणादायी मुलाखत पहिली. धुळ्याहून लंडन, आणि पुढे स्कॉटलंड वगैरे फिरून फाटक दांपत्य शेवटी वॉरिंग्टन मधे स्थाईक झाले. पण वॉररिंग्टन मधेच कां? कारण मुकुंद काकांकडून इथे एक महान कार्य व्हायचं होतं. ५० वर्षांपूर्वी त्यांनी बांधलेलं डरेसबरी टॉवर आजही मान उंच करून उभं आहे. *व्हॅन द ग्राफ* या एका त्याकाळच्या नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रकल्पाकरता  हे टाॅवर  तयार होत होतं. त्याच डिझाहीनही तितकच नाविन्यपूर्ण होतं. २ मीटर जाड भिंतींना कमीतकमी १०० वर्षं अगदी लहानसा सुद्धा  तडा जाणार नाही, त्याचा पांढरा रंग थोडाही बदलणार नाही या करता लागणारं सिमेंट विशेष संशोधनातून तयार केलं होतं. ही रेसिपी आता जगभरातील सर्व न्युक्लिअर आणि तीव्र रेडिएशन असणाऱ्या प्रकल्पामध्ये वापरली जाते.

त्या टॉवरची रचनाही अत्यंत कल्पक आहे. आकाश निरभ्र असताना टॉवरच्या एका बाजूला लिव्हरपूल तर दुसऱ्या बाजूला मँचेस्टर पर्यंत तर पायथ्याशी मर्सीचे हिरव्यागार शेतातून वाहणारे दोन छोटे कालवे दिसतात. मधून मधून लंडन- ग्लास-गो मार्गावरून सुसाट धावणाऱ्या ट्रेन्स आधीच नयनरम्य असलेल्या परिसराचे सौन्दर्य अधिकच खुलवतात.

तेरेसा मे प्रधानमंत्री असताना आपल्या मंत्रिमंडळाची एक बैठक त्यांनी या टॉवरमध्ये घेतली होती.

 स्टॉकटन हिथ ते  M56 च्या A56 वरून Junction 11 ला जाताना,  किंवा मर्सी ब्रिज वरून  जाता-येता गर्द झाडीतून वर डोकावणार हे सुंदर वास्तुशिल्प एकदम उठून दिसत. जमेल तेंव्हा वाॅरिंगन वासियांनी हे द्रुष्य

नक्की पाहाव. 


अशा या आव्हानात्मक प्रकल्पावरील वृत्तांत मला प्रत्यक्ष मुकुंद काकांकडूनच ऐकायला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो.

  

(या टॉवरची एक छोटी प्रतिकृती लीनाकाकूंच्या शो-केस मधे दिमाखात उभी आहे.) 


https://youtu.be/9QrPWUS6RLo?si=-kGLwd0ke5DypemI



श्रीकांत पट्टलवार

Comments

Popular posts from this blog

धर्म यही आधार (संघ गीत)

या गणराया