Posts

Showing posts from July, 2026

वॉरिंगटन नव्हे वारी-टाऊन : श्रीकांत पट्टलवार- रुणकर्ण (UK)

Image
  वॉरिंगटन नव्हे वारी-टाऊन  श्रीकांत पट्टलवार- रुणकर्ण (UK) ८ जुलै २०२६)   लीना आणि उर्मिला मावशी यांचे आशीर्वाद घेऊन सलग दुसऱ्या वर्षी वॉरिंगटन ते लंडन वारीचा   काल संध्याकाळी (८ जुलै २०२६) शुभारंभ झाला. वारकऱ्यांची , विशेषतः त्यांच्या रखुमाईंची सकाळपासूनच लगबग   सुरू होती. पंढरपूरला आषाढ सरी धो धो कोसळत असताना इंग्लंडला मात्र वैशाख वणवाच   पेटला होता बर्चवूडच्या गर्द झाडीतून झुळझुळणारा थंड वारा   त्यामुळे खूप आल्हाददायक वाटत होता. विठ्ठलाच्या जयघोषासह    तोही  जणू दिंडीत सामील झाला होता. वॉरिंगटनचे रहिवासी हा काय प्रकार आहे?-  हाय , हॅलो, म्हणून वारकऱ्यांशी    कुतूहलाने संवाद साधत होते. ही चक्क लंडन वारी हे कळल्यावर शुभेच्छा पण देत होते. रस्त्या रस्त्यावरील घरांमधली रंगीबेरंगी फुले जणू या दिंडीचे स्वागत करत होते. " वासंतिक कुसुमातून तूच मधुर हासतोस "...   वसंत बापटांच्या या ओळींप्रमाणे   साक्षात विठ्ठल त्या फुलांमधून प्रसन्न होऊन  वारकऱ्यांना आशीर्वाद देत होता.   वारंवार होते ती वारी!   सलग दुसऱ...