या गणराया
🌹या गणराया या🌹
शब्द - विमा जोशी संगीत - श्रीकांत पट्टलवार
या गणराया या छाया आशिष
या दरबारी भूषवा आसन
या सिंहासनी गौरीनंदन
घडू द्या येथे जन मन रंजन
दरबारी या प्रसन्न सुंदर
सनई वाजे मंजुळ सुस्वर
झडे चौघडा चौथऱ्यावर
चिपळ्या टाळांचाही गजर
जमले अगणिक रसिक मान्यवर
स्वागतास तव उत्सुक आतुर
यावे आता आपण सत्वर
शब्द फुलांचा फुलवू मोहर
Comments
Post a Comment